सौर कृषी वाहिनी योजना 2023

सौर कृषि वाहिनी योजनेची ठळक वैशिष्ठे

 1. सोलर वीज प्रकल्प उभारणीसाठी महावितरणच्या ३३/११ केव्ही उपकेंद्रांची यादी उपलब्ध क्षमतेसहित पोर्टलवर उपलब्ध
 2. शेतकऱ्यांना त्यांच्याकडील अतिरिक्त जमीन असल्यास सदर प्रकल्पासाठी भाडेतत्वावर देण्याची सुविधा
 3. महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार सरकारी जागेसाठी ३० वर्षासाठी रु. १/- भाडे राहील.
 4. खाजगी जमीन भाडेतत्वावर दिल्यास वार्षिक प्रती एकर रु. ३०,०००/- भाडे राहील.

अर्जदार विकासक असल्यास

आपणास विकासक (Developer) म्हणून नोंदणी करावयाची असल्यास, महावितरणच्या नूतनीकरण ऊर्जा विभागाने प्रकाशित केलेल्या निविदा प्रक्रियेत भाग घ्यावा लागेल. निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी कृपया ई-निविदा पोर्टलवर कंत्राटदार / विकासक म्हणून नोंदणी करा, ही नोंदणी निशुल्क आहे.

जागेची पात्रता

 1. जागेचे क्षेत्रफळ कमीत कमी ३ एकर ते जास्तीत जास्त ५० एकर असावे.
 2. महावितरण च्या ३३/११ K .V उपकेंद्राजवळील जमिनीला प्राधान्य देण्यात येईल ( ५ कि .मी च्या आतील).

सौर कृषि वाहिनी योजनेची उद्दिष्टे

 1. सोलर वीज प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणे.
 2. शेतीप्रधान क्षेत्रांमध्ये असलेल्या उपकेन्द्राच्या ५ किमी परीक्षेत्रामध्ये २ ते १० मेगावॉट क्षमतेचे सोलर वीज प्रकल्प उभारणे.

जागेसाठी कोण अर्ज करू शकतात

 1. स्वतः शेतकरी
 2. शेतकऱ्याचा गट
 3. सहकारी संस्था
 4. वॉटर युसर असोसिएशन
 5. साखर कारखाने
 6. जल उपसा केंद्र
 7. ग्रामपंचायत
 8. उद्योग
 9. आणि इतर संस्था

महावितरण कंपनीस भाडेतत्वावर देण्यात येणाऱ्या जागेसाठी अर्जदारास मार्गदर्शक सूचना

सौर कृषी वाहिनी योजना पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी विकासकासाठी मार्गदर्शक तत्त्वे/वापरकर्ता पुस्तिका

लिंक वर क्लीक करून डाउनलोड करा

उपकेंद्रांची यादी

लिंक वर क्लीक करून डाउनलोड करा

अर्ज नोंदणी

अर्ज करण्यासाठी लिंक वर क्लीक करा