महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी/ Free Flour Mill Scheme

Free Flour Mill Yojana Maharashtra Apply Here

मित्रांनो महाराष्ट्र शासन त्याचप्रमाणे केंद्रशासन हे महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवीत असते. अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना ह्या शासनाच्या वतीने महिलांसाठी राबविण्यात येत असतात. सरकारच्या वतीने महिलांकरिता मोफत पिठाची गिरणी ही देण्यात येणार आहे. 100 टक्के अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मोफत पिठाची गिरणी योजना मुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे या महिलांना रोजगार देखील प्राप्त होणार आहे. त्यामुळे खास महिलांकरिता राबविण्यात येणारी ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे.

मित्रांनो महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी करिता ऑनलाईन अर्ज हे सुरू झालेले आहेत. या पिठाची गिरणी योजना अंतर्गत महिलांना फ्री पिठाची गिरणी मध्ये वितरित करण्यात येत आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण मोफत पिठाची गिरणी मिळवण्याकरिता अर्ज कसा करायचा? अर्ज कोठे करायचा?  मोफत पिठाची गिरणी करिता आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत? याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील माहिती शेवटपर्यंत वाचा.

मोफत पिठाची गिरणी, मिनी डाळ गिरणी देण्याची योजना सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे,

योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे 

  1. अर्जदार महिलाही बारावी शिकलेली असावी. त्याबाबत पुरावा जोडावा.
  2. आधार कार्ड
  3. 8अ उतारा(घराचा)
  4. विहित नमुन्यातील अर्ज
  5. कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार पेक्षा कमी असल्याबाबत तहसीलदार यांनी दिलेला किंवा तलाठी यांनी दिलेला पुरावा
  6. बँक पासबुक
  7. विज बिल

योजनेची पात्रता

  1.  योजनेचा लाभ हा 18 ते 60 वयोगटातील मुली व महिलांना मिळेल.
  2. लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाखांपर्यंत असणं किंवाच त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  3. मोफत पिठाची योजनेचा फायदा ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला घेऊ शकतात.
  4. या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण केलेल्या असाव्यात.

मोफत पिठाची गिरणी योजना अर्ज कुठे मिळेल?

तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या किंवाच तालुका पंचायत समिती येथील महिला व समाज कल्याण विभाग या विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटावे लागेल. त्यांतर या योजनेबाबत त्यांच्यासोबत चर्चा करावी की आपल्या जिल्हयासाठी देखील अशी काही योजना सुरू आहे का आणि जर सुरू असेल तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अचूक अर्ज सादर करावा व योजनेचा लाभ घ्यावा.

Application form for Free Flour Mill

अर्जदाराचा विहित नमुन्यातील अर्ज – अर्जाची PDF कॉपी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

  1. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे
  2. सर्वप्रथम वरील दिलेल्या लिंकवरून अर्ज डाऊनलोड करा.
  3. अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा.
  4. या योजनेच्या अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये जाऊन भेट द्या.

या योजने अंतर्गत कोण अर्ज करू शकतो?

मित्रांनो शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या मोफत पिठाची गिरणी योजना अंतर्गत महिला अर्ज करू शकतात. 18 ते 60 वयोगटातील मुली तसेच महिला या योजने अंतर्गत अर्ज करू शकतात.

निष्कर्ष:

मित्रांनो, आज तुम्ही या पोस्टमध्ये महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना बद्दल सांगितले आहे. मला आशा आहे की तुम्हाला दिलेली माहिती समजली असेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, तुम्ही खाली टिप्पणी विभागात टिप्पणी करून विचारू शकता.