Kusum Solar Pump Yojana 2023: कुसुम सोलर पंप योजना 2023

Kusum Solar Pump Yojana 2023 :  नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. आपल्या सर्वांना माहीतच आहे विजेची उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना दिवसातून आठ तास सिंचन करावे यासाठी महाराष्ट्र शासनाने 2 लाख पेक्षा जास्त कुसुम सोलर पंप वाटप करण्याची उद्दिष्टे हाती घेतले होते. (Kusum Solar Pump Yojana) आता या योजनेचा लाभ शेतकऱ्याला मिळण्यास सुरुवात होणार आहे. कारण कुसुम सोलर पंप योजनेची ऑनलाईन प्रक्रिया ही सुरू झाली आहे व ही योजना सध्या काही मर्यादित जिल्ह्यांसाठी सुरू झाले आहे. पुढील आठ दिवसात पुढील सर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यात या योजनेची ऑनलाईन सुरू होणार आहे. सध्या कोणत्या जिल्ह्यात ही योजना सुरू झाली आहे व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीचे संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. (Kusum Solar Pump Yojana New Update)

Kusum Solar Pump

कुसुम सोलर पंप ही योजना सध्या स्थितीला सुरू झालेली आहे.  आपल्याला जर या योजनेसाठी अर्ज भरायचा असेल तर यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत व् यासाठी अर्ज कोठे भरायचे ते पहा.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.

  1. आधार कार्ड
  2. सातबारा
  3. बँक खाते क्रमांक
  4. पासपोर्ट साईज दोन फोटो

कोणत्या जिल्ह्यांसाठी ही योजना सद्यस्थितीला सुरू झाली आहे?

  1. अकोला
  2. अमरावती
  3. भंडारा
  4. गडचिरोली
  5. चंद्रपूर
  6. रायगड
  7. पुणे
  8. सिंधुदुर्ग
  9. ठाणे
  10. रत्नागिरी
  11. सातारा.
  12. नागपूर
  13. सांगली
  14. कोल्हापूर
  15. गोंदिया
  16. वर्धा

कोणत्या जिल्ह्यात ही योजना सुरू झाली नाही व ती कधी सुरू होणार ?

  1. अहमदनगर
  2. हिंगोली
  3. मुंबई
  4. नांदेड
  5. नंदुरबार
  6. सोलापूर
  7. नाशिक
  8. वाशिम
  9. यवतमाळ
  10. लातूर
  11. परभणी
  12. जळगाव
  13. जालना
  14. धुळे
  15. संभाजीनगर
  16. बुलढाणा
  17. बीड

या जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीला ही योजना सुरू झालेली नाही, परंतु पुढील पंधरा दिवसात या जिल्ह्यांमध्ये देखील कुसुम सोलर पंप योजनेची ऑनलाईन प्रक्रिया सुरू होणार आहे.

महाकृषि ऊर्जा अभियान – प्रधानमंत्री कुसुम योजना सूचना

अटल सौर कृषिपंप योजना-१ व २ आणि मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमध्ये लाभ घेतलेले शेतकरी महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेसाठी पात्र नाहीत. त्यामुळे त्यांनी महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरु नयेत. तरी सुद्धा अर्ज भरल्यास त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल. महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेअंतर्गत एका लाभार्थी शेतकऱ्याने एकाच सौर कृषिपंपाकरीता अर्ज सादर करावा. एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास इतर अर्ज रद्द करण्यात येईल.

तसेच असे निदर्शनास आले आहे की उपरोक्त योजनेअंतर्गत सौर कृषिपंपाचा लाभ घेतलेले शेतकरी सौर कृषिपंप काढून ठेवतात व लाभ घेतला नसल्याचे भासवून दुसरा सौर कृषिपंप महाकृषि ऊर्जा अभियन पीएम- कुसुम घटक-ब योजने अंतर्गत आस्थापित करुन घेतात. अशी बाब निदर्शनास आल्यास त्यांच्याकडील सौर कृषिपंप काढून घेण्यात येईल व त्यांनी भरलेली लाभार्थी हिस्सा रक्कम जप्त करण्यात येईल व अशा शेतकऱ्यांच्या विरुद्ध FIR करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज  कोठे व कसा भरायचा ?

शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर या योजनेसाठी अर्ज भरायचा असेल तर आपण खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरू शकता.

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

कुसुम सोलर पंप Safe Villages List 2023: 

सुरक्षित गावांची यादी

निष्कर्ष:

मित्रांनो, आज तुम्ही या पोस्टमध्ये कुसुम सोलर पंप योजना 2023 बद्दल सांगितले आहे. मला आशा आहे की तुम्हाला दिलेली माहिती समजली असेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, तुम्ही खाली टिप्पणी विभागात टिप्पणी करून विचारू शकता.