मुख्यमंत्री सोलर फिडर योजना 2023- Mukhyamantri Solar Feeder Yojana 2023

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये फिडर सोलरबाबर निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार शेतकऱ्याला वर्षाला एकरी ५० हजार रुपये दिले जाणार आहेत.

मुख्यमंत्री सोलर फिडर योजना

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये फिडर सोलरबाबर निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार शेतकऱ्याला वर्षाला एकरी ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

हा फायदा पडीक जमिन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे मिळत राहणार आहे. सोलार पॅनल लावण्यासाठी जर शेतकऱ्याने ३० वर्षांच्या करारावर त्याची जमिन राज्य सरकारला दिली तर त्या बदल्यात राज्य सरकार त्या शेतकऱ्याला वर्षाला एकरी पन्नास हजार रुपयांचे भाडे देणार आहे, असे फडणवीस म्हणाले. 

महत्वाचे म्हणजे या भाड्यामद्ये दर वर्षाला ३ टक्क्यांची वाढ होणार आहे. सोलारसाठी मोठे गुंतवणूकदार पैसे गुंतविण्यास तयार आहेत. यामुळे ही वीज राज्य सरकारला ३ रुपये ३० पैसे प्रति युनिट अशी पडेल. कोळशामुळे होणारी पर्यावरणाची हानी देखील होणार नाही. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. 

शेती पंपांना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबविण्याचा त्याचप्रमाणेवर्ष २०२५ पर्यंत ३० टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. 

निष्कर्ष:

तर मित्रांनो या लेखात आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री सोलर फिडर योजना 2023 योजनेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती दिली आहे.