Table of Contents
Namo Shetkari Sanman Nidhi Yojana
केंद्र शासनाच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी देखील काही योजना राबवण्यात येत आहेत. यात पीएम किसान योजना या 2019 मध्ये सुरू झालेल्या योजनेचा देखील समावेश आहे.
विशेष बाब म्हणजे ही स्कीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी स्कीम म्हणून ओळखली जाते. या योजनेअंतर्गत दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात. हे सहा हजार रुपये दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने वर्षातून तीन हप्त्यात वितरित केले जातात.
ही योजना शेतकऱ्यांमध्ये अलीकडे विशेष लोकप्रिय बनले असून याचा कोट्यावधी शेतकऱ्यांना फायदा होत आहे. शेतकऱ्यांमधील लोकप्रियता पाहता या योजनेच्या धरतीवर महाराष्ट्रात नमो शेतकरी सन्मान सन्मान निधी नावाने नवीन योजना सुरू झाली आहे.
यामुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसानचे 6 हजार आणि नमो शेतकऱ्याचे 6000 असे एकूण बारा हजार रुपये वार्षिक मिळणार आहेत. विशेष बाब म्हणजे नमो शेतकरी चे सर्व नियम पीएम किसान प्रमाणेच आहेत. म्हणजे जे शेतकरी पीएम किसानसाठी पात्र राहतील तेच शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र राहणार आहेत.
दरम्यान पीएम किसान संदर्भात शेतकऱ्यांचे काही प्रश्न अजूनही कायम आहेत. यात ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन नाही अशा शेतकऱ्यांना देखील याचा लाभ मिळणार का? हा प्रश्न शेतकऱ्यांकडून कायमच विचारला जातो. अशा परिस्थितीत आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जमीन नावावर नसलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार का?
देशात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या नावावर जमीन नाही मात्र ते इतरांची जमीन कसतात. तसेच काही शेतकऱ्यांच्या वाडवडिलांच्या नावावर जमीन आहे. अशा परिस्थितीत जमीन नावावर नसलेल्या शेतकऱ्यांना या पी एम किसानचा लाभ मिळतो कां? हा प्रश्न शेतकरी उपस्थित करतात.
तर पीएम किसानच्या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. ही योजना दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा आहे अशाच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
जे शेतकरी सरकारी नोकरदार आहेत तसेच करदाते आहेत अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. याव्यतिरिक्त आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींना देखील या योजनेचा लाभ मिळत नाही.
केव्हा येणार पुढचा हफ्ता?
या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत पात्र शेतकऱ्यांना तेरा हफ्ते मिळाले असून शेतकऱ्यांना आतुरता लागली आहे 14व्या हप्त्याची. दरम्यान या योजनेचा 14 वा हप्ता 26 मे ते 31 मे दरम्यान केंद्र शासनाकडून वितरित केला जाणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
दरम्यान या चौदाव्या हफ्त्यासोबतच राज्य शासनाच्या नमो शेतकरीचा पहिला हप्ता देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे. अर्थातच आता राज्यातील पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांना चार हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
Namo Shetkari Sanman Nidhi Yojana
पीएम किसान योजनअंतर्गत आता पर्यंत १३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्या १४ हप्ता येणार असे सांगण्यात येत आहे. पीएम किसानचे हप्ते आल्यानंतर नमो शेतकरी योजनेअंतर्गत ७१ लाख शेतकऱ्यांना पहिला हप्ता खात्यात जमा होणार आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्यातील ३१ तारखेच्या आत पीएम किसान हप्ता येईल, त्यानंतर नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात जमा होण्यास सुरुवात होईल असे सांगण्यात येत आहे.
Namo Shetkari Samman Nidhi Yojana
नमो शेतकरी योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळवण्यासाठी पुढील तीन अटी पुर्ण करावे लागणार आहे. महत्वाचे म्हणजे प्रथम पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी असाल तर तुम्ही आताच ई केवायसी पूर्ण करावी. तसेच बँक खात्याशी आधार नंबर आणि फोन लिंक करावे, तसेच फोन नंबर आधारशी लिंक करावे. यामुळे तुमच्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत पैसे जमा झाल्यावर मेसेज फोन वर मिळेल.
निष्कर्ष:
मित्रांनो, आज तुम्ही या पोस्टमध्ये Namo Shetkari Sanman Nidhi Yojana बद्दल सांगितले आहे. मला आशा आहे की तुम्हाला दिलेली माहिती समजली असेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, तुम्ही खाली टिप्पणी विभागात टिप्पणी करून विचारू शकता.