पेरणी अनुदान योजना संपूर्ण माहिती
नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता पेरणीसाठी एकरी दहा हजार रुपये भेटणार आहेत यासंबंधी नवीन अपडेट झालेली आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिफारस करण्यात आली आहे. मराठवाडा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी 21 लाख शेतकऱ्यांचा सर्व करून ही शिफारस पत्र मंत्रिमंडळाकडे पाठवले आहे. शिफारसी मध्ये सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी खरीप आणि रब्बी हंगामात प्रत्येकी 20 हजार रुपये मिळणार आहेत. तेलंगणामध्ये शेतकऱ्यांना पेरणीसाठी दिली जाणार रोख रक्कम योजना महाराष्ट्र देखील राबवण्याचे शिफारसी मध्ये उल्लेख आहे.
पेरणी अनुदान योजना किती आणि कोणाला रक्कम मिळणार ?
मंत्रिमंडळातर्फे निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांना प्रत्येकी किती पैसे मिळणार आणि ते नक्की कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे आता आपण पाहूया. समजा जर तुमच्याकडे पाच एकर शेती आहे तर तुम्हाला या योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी एकूण रक्कम ही 50 हजार मिळणार आहे.
रब्बी हंगामासाठी देखील 50 हजार रक्कम मिळणार आहे. अशी एकूण एक लाख रुपये रोख रक्कम शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी दिली जाणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांची पेरणी ही चांगली व्हावी, प्रकारे शासनाने शेतकऱ्यांना केलेले हे एक अर्थ सहाय्य आहे. एकरी दहा हजार प्रमाणे ही रक्कम तुम्हाला सरकार द्वारे मिळणार आहे यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार हे सांगण्यात आले आहे.
ही योजना केवळ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी राबवली जावी असा शिफारस यामध्ये सांगण्यात आला आहे त्याद्वारे आपल्याला सांगता येईल की या योजनेसाठी पात्रता निकष आहे आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ दिला जावा अशा पद्धतीचे असतील.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना म्हणजेच मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. मराठवाडा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शिफारस केलेली आहे शिफारस मान्य झाल्यास शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
निष्कर्ष:
मित्रांनो, आज तुम्ही या पोस्टमध्ये पेरणी अनुदान योजना बद्दल सांगितले आहे. मला आशा आहे की तुम्हाला दिलेली माहिती समजली असेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, तुम्ही खाली टिप्पणी विभागात टिप्पणी करून विचारू शकता.